गडचिरोली जिल्यात आज ०३ नव्या बाधितांची नोंद तर ०२ तर कोरोनमुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात ३२२ कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या ०३ असून कोरोनामुक्ताची संख्या ०२ आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३८२९४ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३७५०७ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ८ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.०२ टक्के तर मृत्यू दर २.०३ टक्के झाला आहे.
आज नविन कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली तालुक्यतील ०१ व कुरखेडा तालुक्यातील ०२, जणाचा समावेश असून कोरोनामुक्तामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०२ जणाचा समावेश आहे.
News - Gadchiroli