वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन


- नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याबाबतही घेतला शासनाने निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
प्राथमिक आरोग्य केंद्रे, रूग्णालयांमध्ये   कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा व प्रसुती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास सबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याबाबतचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा जाणवत असल्यासंदर्भातील सुचनेबाबत १६ जुलै रोजी विधान परिषदेत चर्चा करण्यात आली. या चर्चेत आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी रूग्णाचा मृत्यू होत असल्यास उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या  अनुषंगाने ज्या आरोग्य केंद्रात कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी रूग्ण व प्रसुतीदरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास सबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करण्यात येईल. पूर्वपरवानगी, सबळ कारणाशिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरीत कारवाई, वेतनवाढ रोखीची शिक्षा करण्यात येईल, अशी घोषणा विधीमंडळात करण्यात आली होती. याबाबत शासन परिपत्रक काढून शिस्तभंगाच्या कारवाईबाबत आरोग्य सेवा संचालकांना सबंधितांना निर्देश देण्यास सांगण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-03


Related Photos