एम एस डब्ल्यू च्या १० टक्के वाढीव जागा द्या : कुलगुरूंना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका  प्रतिनिधी / देसाईगंज : 
येथील समाजकार्य महाविद्यालयात एम एस डब्ल्यू च्या १०  टक्के वाढीव जागांना मंजुरी देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या कुलगुरूकडे निवेदनातून केली आहे. 
तालुक्यात एकमेव  समाजकार्य महाविद्यालय असून येथे गडचिरोली जिल्ह्यासोबतच भंडारा,  गोंदिया,  चंद्रपूर येथील विद्यार्थी बिएसडब्ल्यू , एमएसडब्ल्यू  करीता  प्रवेश घेत असतात.  एम एस डब्ल्यू भाग एक ची प्रवेश क्षमता ६०  असून प्रवेश पूर्ण झाल्याचे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सांगितले जाते आहे.  त्यामुळे स्थानिक बि एस डब्ल्यू उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएसडब्ल्यू भाग १ च्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत  आहे.  सदर महाविद्यालयाला एम एस डब्ल्यू भाग १ च्या १०  टक्के जागा प्रवेशासाठी वाढवून द्याव्या  अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या कुलगुरूकडे केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-13


Related Photos