महत्वाच्या बातम्या

 हक्क व अधिकार टिकवण्यासाठी बहुजनांनी एकत्रीतपणे चळवळ गतिमान करावी - डाॅ संजय घाटे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : २४ सप्टेंबर २०२६ ला जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली यांच्या वतीने १५३ वा सत्यशोधक समाज स्थापना दिवस फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी मोहुर्ले अध्यक्ष जि.माळी समाज संघटना गडचिरोली, विशेष अतिथी सुभाष सातव प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, डॉ.संजय घाटे विदर्भ प्रांताध्यक्ष महात्मा फुले समता परिषद, प्रा.राजू साखरकर , राजेंद्र मांदाडे प्रदेश कार्याध्यक्षा अ.भा.माळी महासंघ, अमोल गुरनुले प्रवक्ता अ.भा.मा.म., काळपांडे शहराध्यक्षा अकोला, मार्गदर्शक भीमराज पात्रीकर , प्रा. डॉ. दशरथ आदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. 

या कार्यक्रमानिमित्त सुभाष सातव यांनी सत्यशोधक चळवळ निर्मिती व उद्देश याबद्दल मार्गदर्शन केले व महात्मा फुले यांच्या वेशात मी महात्मा फुले बोलतोय हा एक पात्री प्रयोग सादर केला  .डॉ. संजय घाटे यांनी , सर्व एससी एसटी ओबीसी यांनी एकत्र येऊन हक्क आणि अधिकारासाठी महामानवांच्या विचारांची चळवळ गतिमान करावी असे आवाहन केले. विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपापले अनमोल विचार  प्रतिपादित केले.

याप्रसंगी महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष व अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अखिल भारतीय माळी महासंघच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी भिमराज पात्रीकर व महिला आघाडी अध्यक्षपदी अल्काताई गुरनूले आणि महात्मा फुले समता परिषद च्या उत्तर गडचिरोली अध्यक्षपदी  कमलेश बारसकर व दक्षिण गडचिरोली अध्यक्षपदी उमेश मोहुर्ले यांची एकमताने निवड झाली.

या कार्यक्रमात जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील समाजबांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम लेनगुरे प्रास्ताविक हरिदासजी कोटरंगे कार्याध्यक्ष, तर आभार अलकाताई गुरनुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुखदेव  जेंगठे, प्रभाकर कोटरंगे, योगेश सोनुले ,संतोष मोहुर्ले व महिला कार्यकारणी सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.





  Print






Related Photos