कृषी कायद्यांविरोधात लवकरच भाजप खासदार राजीनामा देणार : राकेश टिकेत यांचा दावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / हरियाणा :
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनास 100 दिवस पूर्ण होणार आहेत. या दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी एक दावा करून भाजपची (बीजेपी) धडधड वाढवली आहे. राकेश टिकेत यांचे म्हणणे आहे की, या महिन्यातच आंदोलनाच्या समर्थनात एक भाजप खासदार राजीनामा देईल, जितके भाजप खासदार आहेत, तितके दिवस हे आंदोलन सुरू राहील.
राकेश टिकेत यांनी भाजप खासदाराचे नाव जाहीर केलेला  नाही. मात्र अनेक शक्यता चर्चिल्या जात आहेत. काही लोकांचे  म्हणणे आहे की राजीनामा देणारे खासदार पश्चिम यूपी मधील असू शकतात, तर काही लोकांच म्हणण आहे की, पंजाब किंवा हरियाणाचे भाजप खासदार आपला राजीनामा देऊ शकतात.
आजतकसोबत बोलताना राकेश टिकेत यांनी हा दावा केला. टिकेत म्हणाले की, सरकार म्हणते की तुम्ही आपलं पिक कुठेही विकू शकता आणि कोणत्याही दराने विकू शकतात.' पुढे बोलताना 'जिथे कृषीवर कायदे बनले आहेत, त्या संसदेच्या बाहेर शेतकऱ्यांनी पीक विकणं आवश्यक आहे, कारण तिथेच MSP ची गॅरंटी दिली जाईल', असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले की, शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपले पिक थेट दिल्लीत घेऊन यावे आणि संसदेच्या परिसरात आपले पिक विकावे कारण त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे. राकेश टिकेत यांनी ही गोष्टही सांगितली की पुढल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये जाऊन पंचायत भरवतील.
  Print


News - World | Posted : 2021-03-04


Related Photos