महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पधेत पहिल्या दिवशी धावपटूंचा थरार !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे काल उद्घाटन झाल्यानंतर आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजेपासूनच मुलींच्या १ हजार ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेपासून विविध खेळांची सुरूवात झाली. प्रथम फेरीसाठी रंगलेल्या लढतील मुली व मुलांच्या १ हजार ५०० मीटर,  ४०० मीटर व १०० मीटर, १०० मीटर अडथळ्याची शर्यत व ४X१०० रिले या धावण्याची स्पर्धा झाल्या. तसेच १०० मीटर व ४०० मीटर उपांत्य फेरीचीही लढत झाली यात विद्यार्थ्यांनी पूर्ण ताकदीनिशी धावल्याने प्रेक्षकांना धावपटूंचा थरार अनुभवास मिळाला.

यासोबतच आज अ-गटाच्या व ब- गटाच्या पात्रता फेरीसाठी थाळी फेक, उंच उडी, गोळा फेक, तिहेरी उडी, हतोडा फेक या स्पर्धेतही खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले.





  Print






News - Chandrapur




Related Photos