महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी : रेती घाटातून अवैद्य रेती उत्खनन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील रेती घाटावर अवैद्य रेती वाहतूक करण्यासाठी रेती तस्करी करणाऱ्यांनी कारवाई पासून वाचण्या करिता व स्वतःला आर्थिक जास्त लाभ व्हावा म्हणून जादा दराने वाळूची विक्री करण्यासाठी सकाळ, दुपार, सायंकाळ जसे काही डॉक्टरचे टॅबलेट लागले आहेत. अशा प्रकारे खुलेआम वाळूची तस्करी केल्या जात आहे. इतकी हिंमत यांच्यात आली तरी कुठून आणि यांच्यावर कठोर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.

आपल्या ट्रॅक्टरवर अवैध रेती उत्खनंची कारवाई होईल हे धाक न बाळगता थेट सकाळी, दुपार, सायकाड व सुट्टीच्या दिवशी बोरघाट, तुकुम,कडमगाव मोहुरली या नदी घाटातून विविध ठिकाणी चोर रस्ते तयार करून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीची वाहतूक केली जात आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून वाळू विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे केला जात आहे. यामुळे शासनाचा कोठ्यवधी महसूल बुडत आहे यास जबाबदार कोण.

झिरो रॉयल्टीच्या नावावर शासनाची दिशाभूल : शासनाने घरकुला करिता काही दिवस अगोदर झिरो रॉयल्टी दिली होती. मात्र या रेती माफीयांनी गैरफायदा घेत जसे की रॉयल्टी आहे वाघधरा, जयनगर/विक्रमपुर पण रेती यायची चामोर्शी शहरात कारण चार ते पाच हजार रुपये दराने विकणे अशा प्रकारे अवैध रेती वाहतूक व व्यवसाय करणाऱ्या बाबत महसूल प्रशासन अनभिज्ञ नसून फक्त त्यांनी कुंभकर्ण झोप येत असल्याचे सोंग घेतलेले असून अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या माफियांना रात्रीच्या व सकाळीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करायला मुभा मिळत आहे.

अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे. दीड ते दोन हजार रुपयाला मिळणारी रेती गरीब असो की सामान्य नागरिकांना रेती घाट लिलाव न झाल्याने रात्रीच्या व सकाळीच्या वेळेस टाकणाऱ्या रेती माफिया कडून चार ते पाच हजार रुपयाने घ्यावी लागत असल्याने गरीब नागरिकाला घर बांधण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय असे चित्र पाहायला मिळत आहे. तरी लवकरात लवकर रेती तस्कराबाबत एक स्पेशन कमिटी नेमनुक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos