महत्वाच्या बातम्या

 इंग्रजी नंतर हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत घोळ : विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : बारावी बाेर्डाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये केलेल्या अक्षम्य चुकांमुळे नाचक्की झालेल्या राज्य शिक्षण मंडळाला दुसऱ्या दिवशी हिंदीच्या पेपरमधील चुकांमुळेही ताेंडघशी पडावे लागले.

हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत दाेन चुका आढळून आल्या आहेत. त्या किरकाेळ असल्या तरी विद्यार्थ्यांना गाेंधळात टाकण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.

प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नामध्ये धड्याचा काही भाग दिला आहे व त्यावर प्रश्न विचारले आहेत. यातील एका कृतीमध्ये प्रश्नातील पर्यायांचा क्रमांक गाेंधळविणारा आहे. यात चार शब्दांचे समानार्थी शब्द विचारले असून प्रश्नांचा क्रमांक १, २, ३, ४ असे नमूद करण्याऐवजी सर्वांना १ हाच क्रमांक देण्यात आला आहे. दुसऱ्या एका गद्य उताऱ्यासाठी विचारलेल्या विरुद्धार्थी शब्दांच्या प्रश्नातही क्रमांक १ ते ४ ऐवजी १, २ व १, २ असेच क्रमांक दिले आहेत.

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या घाेडचुकांमुळे शिक्षण मंडळाची पहिल्याच पेपरच्या दिवशी चांगलीच बदनामी झाली. दुसऱ्या पेपरमध्ये किरकाेळ चुका असल्या तरी दुर्लक्षित करता येण्याजाेग्या नाहीत. त्यामुळे बाेर्डाच्या अभ्यास मंडळामध्ये आलबेल नाही, असेच दिसून येत आहे.

- हिंदीच्या पेपरमध्येही काॅपी

दरम्यान, बुधवारी हिंदीच्या पेपरमध्येही काॅपीचा गैरप्रकार समाेर आला आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये नागपूर विभागात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली हाेती. हिंदीच्या पेपरमध्ये तीन विद्यार्थी काॅपी करताना सापडले. यामध्ये गाेंदियात दोन आणि नागपुरात एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इंग्रजीपाठोपाठ हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुका होणे म्हणजे राज्याचे शिक्षण मंडळ झोपेतच काम करत आहे की काय? शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. राज्याच्या शिक्षण मंडळाने अशा प्रकारे हलगर्जीपणे काम करून महाराष्ट्राच्या शैक्षणिक संस्कृतीचे मोठे नुकसान केले आहे.

  Print


News - Nagpur
Related Photos