बल्लारपूरात पहाटे एलसीबीची धडक कारवाई : बामणी टी-पॉइंटवर अवैध रेती वाहतूक पकडली : ४५ लाखांचा हायवा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर परिसरात अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत तब्बल ४५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बामणी टी-पॉइंट येथे ही कारवाई करण्यात आली.
पोंभूर्णा परिसरातून अवैधरित्या रेती भरून हायवा ट्रक बल्लारपूर मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास सापळा रचून संशयित हायवा अडविला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ९ ब्रास रेतीची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी TATA Signa कंपनीचा एमएच ३४ सीक्यू ११९० क्रमांकाचा हायवा ट्रक जप्त केला. या वाहनाची किंमत अंदाजे ४५ लाख रुपये असून त्यामधील ९० हजार रुपये किमतीची ९ ब्रास रेतीही जप्त करण्यात आली. एकूण ४५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी चालक गणेश शिवाजी कोरपल्लेवार (वय २५) रा. नारपठार, ता. जिवती यास अटक करून याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहन मालक गोपीनाथ राठोड रा. सारंगापूर, ता. जिवती हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सदर कारवाईनंतर पोस्टे बल्लारपूर येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९ तसेच जमीन महसूल कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा संतोष येलपुलवार, गणेश भोयर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




