सावली तालुक्यातील ४८ गावांना मिळणार शुद्ध पाणी : आमदार विजय वडेट्टीवार


- जलमिशन योजने अंतर्गत ९० कोटींचा निधी मंजुर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील ग्रामखेड्यांची शुद्ध पेयजल समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे. तालुक्यातील ४८ गावांना माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत अंदाजे ९० कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 21 गावांना नळ योजनेचे कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सलग दोन वर्षे कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापनाची सूत्रे सांभाळणारे मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी जीवाची परवा न करता राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
कोरोना संकट टाळण्यासोबतच विकास कामांवर भरही दिला. अशाच विकास कामांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील एकूण ४८ गावांना दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य जपने कठीण जात असल्याची समस्या वर्षानुवर्षांपासून भेडसावत होती या गंभीर समस्येच्या निराकारणाकरिता माजी मंत्री वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन त्या ४८ गावांना शुद्ध पेयजल मिळावे याकरिता विशेष पाठपुराव्यातून ९० कोटीं निधीची मंजुरी मिळवून दिली.
News - Chandrapur




Petrol Price




