महत्वाच्या बातम्या

 रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सर्व उपविभाग व तालुक्यात तपासणी नाका तसेच भरारी पथके स्थापन करण्यात आली असून हिंगणघाट व देवळी तालुक्यात अवैध वाहतुक करणारे टिप्पर जप्त करण्यात आले.

तहसीलदार हिंगणघाट यांनी भरारी पथकासमावेत राळेगाव ते अल्लीपूर मार्गावर अवैध रेती वाहतुक करणारे दोन टिप्पर जप्त करुन तहसील कार्यालय, हिंगणघाट येथे जमा करण्यात आले. तसेच यापुर्वी ६ टॅक्ट्ररवर कारवाई करुन जप्त करण्यात आले.

तहसीलदार देवळी यांनी भरारी पथकासमावेत देवळी ते आंजी मार्गावर आंजीजवळ रेती वाहतूक करणारे पाच टिप्पर जप्त करुन तहसील कार्यालय देवळी येथे जमा करण्यात आले. सर्व जप्त केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos