महत्वाच्या बातम्या

 अमृत महाआवास अभियानाचा संचालकांनी घेतला आढावा


- २३ डिसेंबर रोजी घरकुल विभागाची आढावा बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : अमृत महाआवास अभियानाचा आढावा राज्य व्यवस्थापन कक्ष, मुंबई चे संचालक राजाराम दिघे यांनी नुकताच घेतला. दिघे हे २३ डिसेंबर २०२२ रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हयातील घरकुल विभागाची आढावा बैठक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात घेतली.
यावेळी गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, धीरज चाहंदे, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पुष्पा पडोळे, विभागीय प्रोग्रामर शुभम हर्षे, जिल्हा प्रोग्रामर आशिष चकोले, जिल्हा डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रफुल मडामे, सचिन बडवाईक, पंचायत समिती भंडारा डाटा एन्ट्री ऑपरेटर बासप्पा फाये, कुणाल राऊत, विन्सी सार्वे, पारितोष ठवकर, अविनास वाघमारे, पुजा ठवरे, जुही कातोरे, आकाश राखडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सुरेंद्र शहारे व तालुक्यातील घरकुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत संचालक राजाराम दिघे यांनी जिल्ह्यातील घरकुले३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मंजुर करणे व ३१ मार्च २०२३ पर्यंत पुर्ण करुन घेण्यास सांगितले. त्यांनी पंचायत समिती भंडारा येथील गट ग्रामपंचायत सर्पेवाडा मधील इंजेवाडा गावातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत उत्कृष्ठ घरकुल गृहसंकुलाला भेट देवून पाहणी केली.
दिघे यांनी पंचायत समिती मोहाडी येथील ग्रामपंचायत ताडगाव अंतर्गत उत्कृष्ट बहुमजली इमारतीची पाहणी केली. ग्रामपंचायत जांभोरा येथील गृह संकुलाला भेट दिली. यावेळी दिघे यांनी घरकुल लाभार्थी तथा ग्रामस्थांशी चर्चा करुन घरकुल योजनेबद्दल मार्गदर्शन केले असता त्यांना जिल्हयात रेतीची अडचण असून रेती अभावी जिल्ह्यातील बरीच घरे ही अपूर्ण असल्याचे त्यांचे लक्षात आले. याप्रसंगी त्यांनी लाभार्थ्यांना रेतीला पुरक अश्या पर्यायी उपयोगात येणाऱ्या नावीन्यपुर्ण बाबींवर विचार करण्यास सांगितले.





  Print






News - Bhandara




Related Photos