महत्वाच्या बातम्या

 कुरूड येथे श्री गजानन महाराज प्रगट दिना निमित्त गोपाल काल्याचे आयोजन


- सर्व भाविक-भक्त जनतेंनी गोपाल काल्याचा लाभ घेण्याचे मनोज ढोरे यांनी केले आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : 
तालुक्यातील कुरुड येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन ७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुारीपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुडच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून हरी भक्त परायण लीनाताई बागळे, सोनिताई आळंदीकर व कावळे महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून प्रवचनाचा कीर्तनाचा हरिपाठ व गोपाल काल्याचा कार्यक्रम संपन्न होत असल्याने सर्व भाविक-भक्त जनता जनार्दन यांनी उद्या १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुड याठिकाणी गोपाल  काल्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सचिव ओबीसी काँग्रेस कमिटी गडचिरोली तथा प्रदेश सचिव पोलीस दक्षता पीपल्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य मनोज महादेवराव ढोरे यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन येथील पाटील मोहल्ला याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी होऊन भजन कीर्तन पालखी मिरवणूक व विविध कार्यक्रम सातही दिवस साजरे करून श्रींचा गाजावाजा करून श्री गजानन महाराज प्रगट दिनी श्रींच्या चरणी माथा टेकून तल्लीन होत असतात अशाच प्रकारे उद्याला श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुड याठिकाणी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोपाल काल्यानंतर महाप्रसाद व सायंकाळच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असल्याने याचा लाभ भाविक-भक्त जनता-जनार्दन कुरुड ग्रामवासिय जनतेंनी घ्यावा असेही ओबीसी काँगेस कमिटीचे जिल्हा सचिव मनोज ढोरे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos