महत्वाच्या बातम्या

 पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा, यूजीसीकडून घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वुत्तसंस्था / मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पर्यंत देशभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये बी.ए. बी.कॉम. बी.एस. सी. चार वर्षे पदवीपूर्व अभ्यासक्रम लागू होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी चार वर्षे पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम प्रारूपाला मान्यता दिली असून पुढील आठवडय़ात या अभ्यासक्रमांसाठीचे नवे नियम देशातील सर्व विद्यापीठांमध्ये लागू केले जाणार आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये ४ वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम लागू केले जातील. सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतेक राज्यस्तरीय आणि खासगी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम राबविणार आहेत. याशिवाय देशभरातील अनेक विद्यापीठांनी देखील हा अभ्यासक्रम राबविण्यास सहमती दर्शविली आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी संपूर्ण चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे प्रारूप लवकरच सार्वजनिक केले जाईल, असे जाहीर केले. सध्या पदवीच्या पहिल्या व दुसऱया वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांना चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. पुढील शैक्षणिक वर्षात जुन्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळू शकते. युजीसीने विद्यापीठांना या अभ्यासक्रमासाठी नवे नियम तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विद्यापीठांच्या शैक्षणिक परिषद आणि कार्यकारी परिषदेत याबाबत आवश्यक नियम निश्चित केले जाऊ शकतात. अंतिम वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांनाही चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. चार वर्षे पदवी अभ्यासक्रम हा देशपातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांची बदली, स्थलांतर व अन्य कारणांमुळे इतर राज्यात जावे लागल्यास कोणत्याही राज्यातून अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. एखाद्या विषयात किंवा शाखेत एक वर्ष पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र किंवा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र, तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर बॅचलर पदवी आणि ४ वर्षांचा बहुविद्याशाखीय बॅचलर प्रोग्राम प्रमाणपत्र देण्यात येईल. एक शैक्षणिक बँक ऑफ व्रेडिटची स्थापना केली जाईल. जी विविध मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थाकडून मिळवलेले शैक्षणिक व्रेडिट डिजिटली संग्रहित करेल. याद्वारे व्रेडिट्सचा विचार करून पदवी प्रदान करता येईल.
पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पर्याय
पुढील वर्षी म्हणजेच २०२३-२४ पासून पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर चार वर्षे पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा पर्याय असणार आहे. चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची योजना जुन्या विद्यार्थ्यांसाठीही मंजूर केली जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी सामान्य तीन वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. त्यांना पुढील सत्रापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सहभागी होता येईल.
तीन वर्षे पदवी कोर्सही सुरू राहणार
चार वर्षे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच सध्या सुरू असलेला तीन वर्षे पदवी कोर्सही सुरूच राहणार आहे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची सक्ती केली जाणार नसून विद्यार्थी आधीपासून सुरू असलेले तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमालाही प्रवेश घेऊ शकतात, असे यूजीसीने स्पष्ट केले.





  Print






News - Rajy




Related Photos