महत्वाच्या बातम्या

 अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधणे उपलब्ध व्हावी यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण योजनेचा मातंग समाजातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मातंग समाजातील गरजुंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधणे  उपलब्ध व्हावे व त्यांना ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण पाहिजे त्या प्रशिक्षणाकरीता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यासाठी २०० प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विहित नमुन्यात जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कार्यालयास अर्ज सादर करावा.

अर्जदारांनी अर्जासोबत जातीचा दाखला, कुटूंबाचा ३ लाख रुपयापर्यंत मर्यादेत उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्र, रेशनकार्ड झेराक्स प्रत, आधारकार्ड झेराक्स, मतदान कार्ड, आधारलिंक असलेला मोबाईल क्रमांक, अर्जदाराचा शैक्षणिक  दाखला जोडवा.

अर्जदार हा मातंग समाज व त्सम १२ पोट जातीतील असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० दरम्यान असावे, महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदारानी यापुर्वी शासनाच्या महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदारास आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा लागेल, असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos