महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वाघेझरी येथील माऊली नावाचे नाट्यप्रयोगाचे उदघाटन


- वाघेझरी येथील नवयुवक संयुक्त मित्रमंडळाकडून नाट्यप्रयोगाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील वाघेझरी येथील नवयुवक संयुक्त मित्रमंडळाकडून आयोजित माऊली नावाचे नाट्यप्रयोगाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रमुख,  माजी जि.प. अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.

उदघाटनीय मार्गदर्शन करतांना कंकडालवार यांनी म्हणाले कि, आजच्या या डिजिटल काळात सुद्धा ग्रामीण भागात नाटकांचे महत्व अबाधित असून नाट्यप्रयोगाचे सादरीकरणातून समाजात जनजागृतीचे कार्य होत असतात. आणि यातून समाजाचे परिवर्तन ही होत असतात.

या कार्यक्रमाचे सह उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी तर अध्यक्ष म्हणून अध्यक्ष नंदू मट्टमी, सचिव प्रज्वल नागूलवार, अध्यक्ष सुधाकर गोट्टा होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगरपंचायतचे सभापती नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी सदस्यसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos