महत्वाच्या बातम्या

 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, नापोअं सचिन अल्लेवार व मपोहवा अनिता मोहुर्ले यांची उपस्थिती होती. मदन दिवटे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दिवाकर मोहितकर होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ललित गेडाम यांनी केले. यावेळी प्रा. रोशन साखरकर, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. विनय कवाडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश मेश्राम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जनजागृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत व्यसनमुक्त युवक – सशक्त समाज हा संदेश देण्यात आला.





  Print






Related Photos