महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांसाठी १३ वा हप्ता लवकरच, लाभ घेण्यासाठी E-KYC करा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : आजही देशात अनेक शेतकरी आहेत, ज्यांना शेती करताना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत आहे.
शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करून त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनांचा उद्देश आहे. २०१८ मध्ये, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांची मदत दिली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये जमा केले जातात.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १२ हप्ते पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी भारत सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात १३ व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करू शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया - शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली. दर चार महिन्यात एकदा २ हजार रुपयांचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो.
वर्षभरात असे एकूण तीन हप्ते म्हणजेच एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांच लक्ष १३ व्या हप्त्याकडे लागले आहे.
या ४ बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडी वर देतायेत ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर यादी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार जानेवारी २०२३ मध्ये देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात १३ व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करू शकते.
मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेची प्रत लवकरात लवकर योजनेत जमा करावी. तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमच्या शिधापत्रिकेची प्रत देखील सबमिट करू शकता. त्याचप्रमाने तुम्ही तुमची ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी. जर तुम्ही तुमची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी केली नाही. तर या स्थितीत तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात.





  Print






News - Rajy




Related Photos