पुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्हयातील पुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मृत पावलेल्या व्यक्तींच्या तसेच जखमी झालेल्यांना प्रशासनाने तात्काळ सर्वतोपरी मदत करावी व या संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चैकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
  या संदर्भात केन्द्रीय रक्षा राज्यमंत्री डाॅ. सुभाषजी भामरे यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधून विस्फोटक निष्क्रीय करतांना झालेल्या अपघाताची माहिती देवून क्षतिग्रस्तांना त्वरीत शासकीय मदत देण्यासोबतच या संपुर्ण प्रकरणाची सखोली चौकशी करण्याची विनंती केली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेन्द्र  फडणवीस, केन्द्रीय रक्षामंत्री श्रीमती निर्मला सितारमन, वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री  सुधिर मुनगंटीवार हे देखील क्षतीग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या दृष्टकोनातून जिल्हा प्रशासनासोबत सतत संपर्क साधत आहेत . या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे देखील घटनास्थळी लवकरच भेट देणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिली तसेच आयुध निर्माणी परीसरात झालेली दुर्घटना मध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली .   Print


News - Wardha | Posted : 2018-11-20


Related Photos