महत्वाच्या बातम्या

 पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली, आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली, यांच्या संयुक्त विद्यमाने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली, येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये स्थानिक कंपनी उपस्थित राहणार असून सदर रोजगार मेळाव्याकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, ईच्छुक येथील उत्तीर्ण असलेल्या ईच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स सह स्वखर्चाने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली, यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. दुरध्वनी क्रंमाक ०७१३२-२२२३६८ आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos