महत्वाच्या बातम्या

 अवैध रेतीची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई : वाहनासह २० लाख २५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील १९ एप्रिल २०२३ ला स्टाफ हा शासकीय वाहनाने कन्हान उपविभागातील पोस्टे मौदा हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण यांच्या आदेशान्वये पेट्रोलिंग व अवैध रेती वाहतुक करणान्यांवर कारवाई करणेकामी १९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०६.५० वा. दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, एक ट्रकमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. 

सदर मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ यांनी मौदा येथील बोरगाव पुलाजवळ नाकाबंदी करीत असताना एक ट्रक प्राप्त माहितीप्रमाणे नागपूरच्या दिशेने येतांना दिसुन आले. सदर ट्रकला थाबण्याचा इशारा देवुन थांबविले असता ट्रक क्र. एम. एच-३६ / एफ-३०७५ यामध्ये चालक आरोपी प्रशांत सुखदेव मारबते (३५) रा. खैरी वेटाला ता. भंडारा जि. भंडारा यास त्याचे ट्रकमध्ये असलेल्या मुद्देमालाबाबत विचारले असता, त्याने सदर ट्रकमध्ये रेतीचा मुद्देमाल भरल्याचे सांगितले. त्यास सदर रेतीबाबत परवाना रॉयल्टी विचारले असता त्याने त्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर ट्रक कोणाच्या मालकीचे आहे व त्याने सदर ट्रकमध्ये कोणाच्या सांगणेवरून चोरीची रेती ट्रकमध्ये भरून वाहुन नेत असल्याबाबत विचारणा केली असता स्वतः ट्रकमालक असून स्वतःच अवैधरीत्या विनापरवाना चोरीची रेतीची वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यांचेजवळुन रेतीसह एक पिवळया रंगाचा दहाचाकी ट्रक क्र. एम. एच. ३६ / एफ- ३०७५ किमती अंदाजे २० लाख रू. ज्यामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती भरलेली किमती अंदाजे २५ हजार रु. असा एकुण वाहनासह २० लाख २५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नापोशि/ १९२७ शंकर मडावी वाहतुक शाखा नाग्रा यांच्या रीपोर्टवरून पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोस्टे मौदा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे मौदा हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विजय माहुलकर यांचे नेतृत्वात चालक सहायक फौजदार सुधीर यादव, चालक पोलीस हवालदार गुरूचरणसिंग जब्बल, पोलीस हवालदार मंगेश काळे, विजय तायडे, पोलीस नायक शंकर मडावी, प्रणय बनाफर, पोलीस शिपाई अमित गेहरे, कार्तिक पुरी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos