भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात चौथ्या दिवशी ३३ नामांकन


- आतापर्यंत एकूण २४ उमेदवारांचे ३८ नामांकन दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
विधानसभा निवडणूकीसाठी आज गुरुवारला 20 उमेदवारांनी 33  नामांकन दाखल केले असून आतापर्यंत 24 उमेदवारांनी 38 नामांकन दाखल केले आहे. आज गुरुवारी  तुमसर 6  नामांकन, भंडारा 12 नामांकन तर साकोली 16 नामांकन दाखल करण्यात आले आहे. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी कडून राजेश काशिवार, डॉ. परिणय फुके यांचा तर भंडारा येथे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व पीरीपा कडून जयदीप कवाडे यांचे सह विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी  नामांकन  दाखल केले आहे.
60-तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये आज 12 उमेदवारांनी 23 नामनिर्देशनपत्र उचल केली.  या क्षेत्रात आतापर्यंत एकूण 51 उमेदवारांनी 135 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. तर  6 उमेदवारांनी 8 नामांकन दाखल केले आहे. यामध्ये  अपक्ष म्हणून के.के. पंचबुध्दे, सदाशिव सिवा ढेंगे, भोलाराम मानिक परशुरामकर,  तर अपक्ष व भारतीय जनता पार्टी कडून चरण वाघमारे यांच्यासह राजकुमार माटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्ष म्हणून तर रविदास श्रावण लोखंडे यांनी बहुजन मुक्ती पार्टी कडून नामांकन दाखल केले.
61-भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आज 8 उमेदवारांकरीता 12 नामांकन दाखल केले आहे. नामांकन दाखल केलेल्या उमेदवारामध्ये प्रशांत बालक रामटेके, नितीन सुर्यभान बागडे, अजय प्रेमदास रंगारी, सदानंद जानुजी कोचे, या अपक्षांसह नितीन मनोज बोरकर (वंचित बहुजन आघाडी), जयदीप जोगेंद्र कवाडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), हिवराज भिकुलाल उके (भारतीय कॅम्युनिष्ट पक्ष), सुरेश मारोती भवसागर (लोकराज्य पार्टी )आदिंचा समावेश आहे.  
62-साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आज 16 उमेदवारांकरीता 30 नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली असुन आता पर्यंत 75 उमेदवारांनी 147 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली आहे. आज चौथ्या दिवशी भारतीय जनता पार्टी कडून डॉ. परिणय फुके, राजेश काशिवार (भारतीय जनता पार्टी), भारतीय जनता पार्टी व अपक्ष म्हणून डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष म्हणून प्रकाश हरिचंद्र देशकर,  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष म्हणून  अण्णा श्रीराम फटे ,उर्मिला प्रशांत आगाशे (बळीराजा पार्टी), चंद्रशेखर श्यामराव टेंभुर्णे (वंचित बहुजन आघाडी) तर अपक्ष म्हणून सुभाष रामचंद्र बावणकुळे,सुहास फुंदे, अतुल परशुरामकर    यांनी  नामांकन दाखल केले आहे.
नामनिदे्रशन पत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर व साकोली यांच्या सतरावरुन दुपारी 3 वाजेपर्यंत वितरित करण्यात येत आहेत.  4 ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारणे व दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-03


Related Photos