आंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात, दोन ठार


वृत्तसंस्था / सातारा :   पोलादपूर ते सातारा दरम्यानच्या  आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापाठाच्या कर्मचाऱ्यांच्या बस चा अपघात होऊन ३० जण ठार झाले होते. दरम्यान  आज २ जानेवारी रोजी पहाटे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून फरशी वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळून दोन जण ठार झाले.  
महाबळेश्वर येथून फरशी वाहून नेणारा ट्रक दाट धुक्यामुळे पहाटे बावलीटोक येथे दरीत कोसळला. अपघातानंतर त्वरीत महाबळेश्वर येथील ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ट्रेकर्स दरीत उतरले व दोन मृतदेह ट्रकमधून बाहेर काढून वर आणण्यात आले. घटनास्थळी पोलादपूर पोलिसांसह महाबळेश्वर पोलीस व ट्रेकर्स मदतकार्य करत आहेत. प्रशांत जाधव यांच्यासह अन्य एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-01-02


Related Photos