ठाणेगाव शेतशिवारात पुरामुळे अडकलेल्या २५ युवकांची आरमोरी पोलिसांनी केली सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
आज ६ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क खंडित झाला आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ठाणेगाव शेतशिवारात काम करीत असेलेले २५ युवक पुराने वेढल्यामुळे अडकून पडले होते. या युवकांना आरमोरी पोलिसांनी मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले आहे. 
  दुपारी १२ वाजताच्या सुमारास  ठाणेगाव जवळील नाला व खोब्रागडी नदीच्या पुराच्या  पाण्याने वेढा घातला. यामुळे शेतात काम करीत असलेले २५ जण अडकले.   त्यांची सुटका  करण्याबाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ आरमोरी चे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी  यांनी वरिष्ठांशी व नियंत्रण कक्ष, गडचिरोली येथे संपर्क साधून तसेच आरमोरी पोलीस ठाण्यातील  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना  घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी रेस्क्यू बोट द्वारें सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos