महत्वाच्या बातम्या

 शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया काळजीपुर्वक पार पाडा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


-  निवडणूक तयारीचा आढावा

-  नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती

-  निवडणूकीसाठी विविध पथके गठीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कोणतीही निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशिल असते. निवडणूकीशी संबंधित प्रत्येक गोष्ट निर्धारित वेळी आणि उत्तमप्रकारे पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती काळजीपुर्वक पार पाडणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह निवडणूकीसाठी नेमण्यात आलेले सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. असून या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्हाभर या निवडणूकीची आचारसंहिता असल्याने कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सार्वत्रिक निवडणूकीच्या धर्तीवर या निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया उत्तमप्रकारे पार पाडावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

जिल्ह्यात या निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मतदान अधिकारी व व्यवस्थापन, तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वाहन व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रांचे नियोजन, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती, स्वीप कार्यक्रम, मतदान केंद्रांवर सुविधा पुरविणे, निवडणूक खर्च यासह वेगवेगळ्या पथकांचे गठन व त्यासाठी अधिकारी नेमण्यात आले आहे. या सर्व बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतले.

निवडणूक उपजिल्हाधिकारी महिरे यांनी या निवडणूकीसाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिले.





  Print






News - Wardha




Related Photos