महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील कवी गाजला आंतरराष्ट्रीय स्तरावर


- ६०० हून अधिक कवितांचा होता समावेश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : कवी विजय वडवेराव आयोजित आंतर राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धा विषय भिडेवाडा बोलला (व्यथा देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची) महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ ला पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अशा स्त्री शिक्षणाच्या उगमस्थानाची, बहुजनाच्या ऐतिहासिक प्रेरणास्थळाची जनजागृती करण्याकरिता या भव्य आणि दिव्य स्पर्धेचे आंतर राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, सिलवासा या राज्यातील तसेच भारताबाहेरील अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, दुबई, आबुधाबी या देशातील कवींनी आपली कविता पाठवून सहभाग घेतला होता. ६०० हुन अधिक कवितांचा समावेश असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या खेडेगावचे युवा कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकवून आपल्या गावचे तसेच गडचिरोली जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. 

या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा ३१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह टिळक रोड पुणे येथे संपन्न होणार आहे. त्या वितरण सोहळ्यात दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ पुस्तक व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या होणाऱ्या सत्काराबद्दल त्यांचे नाते वाईक, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी, गावकरी मंडळी या सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांचे कौतुक करत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos