महत्वाच्या बातम्या

 आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा : हायकोर्टाचा दणका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. चंदा कोचर यांच्या प्रमाणेच वेणूगोपाल धूत यांनाही हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.

१ लाखाच्या जामीनावर तात्काळ कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले. तपासात सहकार्य करावे, साक्षी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. पासपोर्ट जमा करून विनापरवानगी देशाबाहेर जाऊ नये, असे निर्देश दिले आहे. केंद्रीय तपासयंत्रणेला मुंबई उच्च न्यायालयाचा आणखी एक दणका बसला आहे.

याचिकेत हस्तक्षेप करणाऱ्यांची याचिका हायकोर्टाने २५ हजारांचा दंड आकारत फेटाळनी केले आहे. त्यामुळे आता वेणुगोपाल धूत यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी ईडीने ३ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपानंतर त्यांना २०१८ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांनी चंदा कोचर यांच्या पतीला कोट्यवधी रुपये दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे. व्हिडीओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेने नियम धाब्यावर बसवून कर्ज दिले होते. हे कर्ज २००९ ते २०११ दरम्यान देण्यात आले होते. कर्ज देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर यांचाही समावेश होता. त्यामुळे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.





  Print






News - Rajy




Related Photos