महत्वाच्या बातम्या

 राज्यात ३४ ठिकाणी गोवरचा उद्रेक : कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतोय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : कोरोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे. कोरोनापेक्षा पाच पट वेगाने गोवर पसरत आहे. गोवरचा सर्वाधिक धोका नवजात बालकांपासून 5 वर्ष वयाच्या मुलांना आहे. साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अपवादात्मक परिस्थितीत १८ वर्षांवरील व्यक्तींना याची लागण झाल्याचं आढळून आले आहे. दरम्यान गोवरची लस 99 टक्के सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोनाच्या तुलनेत गोवरचा धोका कमी आहे.

मुंबईत गोवरची साथ पसरली आहे. लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असून मंगळवारी गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. लहान मुलांशिवाय मोठ्या व्यक्तींमध्येही गोवरचं प्रमाण दिसून आले आहे. मुंबईसह राज्यात नागपूरपाठोपाठ आता नाशिक, अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. काही रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवले आहेत. राज्यात गोवचा उद्रेक होत असल्याने चिंता व्य्कत होत आहे. कोरोनापेक्षा वाढीचा वेग जास्त असल्याचे चिंतेत अधिक भर पडली आहे. मुंबई आणि ठाणे येथे गोवर सेंटर उभारण्यात आली आहेत.


लस घेण्याचे आवाहन

दरम्यान,  गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांमध्ये आहे. आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या आणि काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यविभागाने केले आहे.


काय आहेत गोवरची लक्षणे? 

- ताप येणे

-  खोकला लागणे

-  घसा दुखणे

- अंग दुखणे 

-  डोळ्यांची जळजळ होणे 

-  डोळे लाल होणे

- 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणे 


ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसेच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो. 





  Print






News - Rajy




Related Photos