महत्वाच्या बातम्या

 आझादी का अमृत महोत्सव निमीत्त फिट इंडिया फ्रीडम रन यशस्वी आयोजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. राबविण्याचे निर्देश प्राप्त झालेले होते. त्याअनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्य 02 ऑक्टोंबर, 2022 सकाळी 07.00 वाजता Plog Run चे आयोजन करण्यात आले.  

स्वच्छता व तंदुरुस्ती अशा दोन्ही उद्देश साद्य करण्याकरीता जागींग/ रनिंग करतेवेळी रस्त्यात दिसणारा कचरा हाताने उचलून कचऱ्याच्या पिशवित/ Garbage Bag मध्ये गोळा करीत जागींग/ रनिंग करीत 02 ऑक्टोंबर, 2022 रोजी Plog Run चे आयोजन इंदिरा गांधी चौक, गडचिरोली पासून ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली पर्यंत करण्यात आले. यावेळी डॉ. मिलींद नरोटे, स्पंदन हॉस्पीटल यांनी Plog Runला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. जिल्हा क्रीडा संकुलात Plog Run चे संपंन्न झाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता  हा उपक्रम राबवून राष्टपीता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.  

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत फिट इंडिया फिट इंडिया फ्रिडम रन व फिटनेस का डोज, आधा घंटा रोज हा उपक्रम 02 ऑक्टोंबर,2022 ते 31  ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र राबवायचा असून जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीक, खेळाडू यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान केले. फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. धावण्याकरीता नागरीकांनी / खेळाडूंनी / गृहीणींनी त्यांच्या सोईनुसार कुठेही, कधीही चालू किंवा धाऊ शकतात. प्रत्येकानी आपआपल्या आवडीचा मार्ग व्यक्तीश: आणि अनुकुल वेळ निवडावी. आवश्यकता वाटल्यास काही वेळाची विश्रांती सुद्धा घेऊ शकतात. प्रत्येकाला स्वत:च्या वेगाने धावणे किंवा चालण्याची मुभा असणार आहे. सदर उपक्रमात सहभागी झाल्यानंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने या उपक्रमात सहभाग घेतल्याबाबतचा डेटा स्वतंत्रपणे (www.fitindia.gov.in) या संकेतस्थळावर मोबाईल ॲपद्वारे किंवा इतर ॲप द्वारे अपलोड करावे. उपरोक्त माहिती अपलोड केली असता त्यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई-मेलद्वारे आपणास प्राप्त होणार आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी याप्रसंगी बोलताना नागरीकांना सांगीतले. 02 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी संपंन्न झालेल्या  कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळे, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos