महत्वाच्या बातम्या

 राजकारण पैसे कमविण्याचे नाही तर जनसेवेचे मार्ग : आमदार विनोद अग्रवाल


- चाबी संघटनेचा कार्यकर्ता न थकतो ना नतमस्तक होतो - आमदार विनोद अग्रवाल

- चाबी संघटनेचा हजारोंच्या संख्येने महा कार्यकर्ता संमेलन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : चाबी संघटनेचा कार्यकर्ता हा कधी थकत नसतो न कधी कोणापुढे नतमस्तक होतो तो राजा सिकंदर सारखा आहे. कोणाच्या पैशापुढे न कधी कोणाच्या जोरावर नतमस्तक होत शेतकऱ्यांच्या आणि गरजूंच्या सदैव मदतीसाठी धावून येतो. अश्या शब्दात जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी चाबी संघटनेतील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. २२ मार्च रोजी स्थानिक जलाराम लॉन येथे आयोजित जनता की पार्टी संघटनेचे कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चाबी संघटनेचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आमदार विनोद अग्रवाल यांनी गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी कार्य करा आपले राजकारण आणि समाजकारण हे लोकसेवेसाठी आणि जनहितार्थ करण्याचे सूचना कार्यकर्त्याना आमदार विनोद अग्रवाल यांनी केली. कोणत्याही जाती आणि धर्माच्या विळख्यात न पडता सर्व धर्म समभाव ही भावना मनात ठेवून सर्व जाती धर्म पंथाच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करण्याचीही आवाहन यावेळी केले. मागील चार वर्षात आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा वाचत कोरोना काळात सर्वांचीच परीक्षा घेतल्याचेही ते बोलले. खरे समाजसेवक कोविड काळात सक्रियतेने कार्यरत होते परंतु केवळ निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यात निघणाऱ्या बेडकांसारखे टरटर करणारे काही स्वयंभू सामाजिक कार्यकर्ते सध्या बघायला मिळत आहेत. स्वतःहून कार्यक्रमाला चंदा देऊन मला अध्यक्ष करा असे म्हणत स्वतःची वाहवाही मिळवण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत आहे. अशा लोकांपासून सावध राहणे व सामान्य नागरिकांना सुद्धा सावध करण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे. असेही यावेळी विरोधकांवर निशाणा साधत आमदार विनोद अग्रवाल यांनी मिश्किलपणे टोलेबाजी केली.

काही नेत्यांना भूमिपूजन करण्याचा मोठ्ठा नाद -

गोंदियातील काही नेत्यांना भूमिपूजन करण्याच्या मोठा नाद असून इतरांनी मंजूर केलेल्या कामांचे सुद्धा श्रेय लुटण्यासाठी स्वतःच भूमिपूजन करत फिरतात जरी स्वतःच्या निधीतून काही कामे आणली तर त्या कामांच्या खर्चापेक्षा जास्त जाहिरातीत व शोबाजी मध्ये खर्च केले जाते. अशा भूमिपूजन वीरांपासून सुद्धा सतर्क रहा. ज्यांना मागील २७ वर्षात जमले नाही ते कार्य आम्ही केवळ मागील २७ महिन्यात करून दाखविले. या कामांचे कुठेही गाजावाजा किंवा भूमिपूजन न करता संपूर्ण कामांचा एकत्रितपणे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करून नागरिकांचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रम जनता की पार्टी संघटनेचे अध्यक्ष छत्रपाल तुरकर यांच्या अध्यक्षतेत पार पडले असून यावेळी संयोजक भाऊराव उके, शहर अध्यक्ष कशिश जयस्वाल, मार्गदर्शक धनंजय तुरकर, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, महिला आघाडी अध्यक्ष चैतालीसिंह नागपुरे, मोहन गौतम, जिलाध्यक्ष किसान आघाडी, नगरपालिका माजी उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरपालिका गटनेते घनश्याम पानतावणे, पक्षाचे नेते इंदल सिंह राठोड, लखन हरीणखेडे, चेतन बहेकार, रेखा लिल्हारे, जिल्हा परिषद सदस्य नंदा वाढीवा, जि.प. सदस्य दीपा चंद्रिकापुरे, जि.प. सदस्य वैशाली पंधरे, प.स. सदस्य शैलजा सोनवाने, प.स. सदस्य विद्याकला पटले, प.स. सदस्य शशि कटरे, प.स. सदस्य मिनाक्षी बारलिंगे, प.स. सदस्य जितेश्वरी रहांगडाले, प.स. सदस्य सोनुला बरेले, प.स. सदस्य कनीराम तावाड़े, प.स. सदस्य हिरामण डहाट, मंचावर उपस्थित होते. तर हजारोच्या संख्येने चाबी संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने व जल्लोषात उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos