नांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नांदेड :
जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील  प्रेमी युगुलाने चैनपूर येथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली. दीक्षा जजबा टोंपे (१८) व तानाजी शिवाजी सोनकांबळे (वय २९) अशी आत्महत्या केलेल्या  प्रेमी युगुलाची नावे आहेत.
देगलूरकर तालुक्यातील मुजळगा गावात राहणाऱ्या दीक्षा टोंपे या तरुणीचे शिवाजी सोनकांबळे याच्याशी प्रेमसंबंध होते.  दीक्षा ही गेल्या दोन वर्षांपासून घरीच होती. चार दिवसापूर्वी दीक्षा आणि शिवाजी हे दोघे घरातून निघून गेले. नातेवाईकांनी दोघांचा शोध घेतला. पण दोघांचा ठावठिकाणा लागला नाही . शेवटी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
शनिवारी संध्याकाळी दोघांचे मृतदेह चैनपूर येथील तलावात सापडले. पोलिसांनी याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना दिली. याप्रकरणी दीक्षाचे वडील जजबा टोपे यांनी प्रेम संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा जबाब नोंदविला.    Print


News - Rajy | Posted : 2018-10-07


Related Photos