याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तद्नंतर शहीद वीर बालकांवर आधारित प्रेरणादायी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. कार्यक्रमाला आदर्श महाविद्यालय, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. यात स्थानिक शिख व सिंधी समाजाच्या छोट्या बालकांनी तलवार, डोळ्यांवर पट्टी बांधून नारळ फोडणे, चक्र फिरवणे, असे साहसी व शौर्य पुर्ण खेळांचे प्रदर्शन करून प्रेक्षकांना अचंबित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितपाल सिंग टुटेजा, हरीश मोटवानी, प्रिन्स अरोरा, इंद्रपालसिंघ खालसा, आनंदसिंघ चावला, प्रा. अमरजीत चावला, गुरबचन मक्कड, डिंपल चावला, शट्टी सलुजा या गुरूद्वारा पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 आदर्श महाविद्यालयात वीर बाल दिवस संपन्न

- गुरू साहेबांच्या चार साहिबजादे यांचे महान हुतात्म्य देशाला प्रेरणादायी : आमदार कृष्णा गजबे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : चार लहान लहान साहेबजादेंनी दिलेले बलिदान इतिहासातील सर्वात मोठे हुतात्म्ये आहे. केवळ ३१८ वर्षापुर्वीचे बलिदान शौर्य गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते. ज्यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम व जुलमी राजवटी विरूद्ध लढा देऊन स्वतःचे बलिदान दिले, असा गौरवशाली दिवस "वीर बाल दिवस" यावर्षी पासून साजरा करण्याचे ठरविले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे." असे मार्गदर्शन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते १० वे शीख गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्य  "वीर बाल दिवस" आदर्श महाविद्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. "गुरू गोविंद सिंग यांनी धर्मरक्षण व राष्ट्र रक्षणासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग केला, त्यांचे चार पुत्र शहीद झाले. त्यांचे दोन पुत्र २६ डिसेंबर १७०४ रोजी वयाच्या ९ आणि ६ व्या वर्षी शहीद झाले. या दोन्ही महान वीर बालकांनी धर्मरक्षणासाठी मरण स्विकारू पण शरण जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेतले व धर्मरक्षणासाठी बलिदान दिले, हे इतिहासातील मोठे शौर्य आहे. हि वृत्ती केवळ एका धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. तेव्हा विदेशी शत्रू राष्ट्रांपासून रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने त्याग भावना अंगिकारावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. यावेळी मंचावर संस्थाध्यक्ष केवळराम घोरमोडे, सचिव मोतिलाल कुकरेजा, उपाध्यक्ष जगदीश शर्मा, सदस्य इंदरप्रितसिंघ टुटेजा, गुरूद्वारा सिंग सेवा सभेचे ग्रंथी साहेब गुरमीत सिंग अरोरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गुरूद्वारा सिंग सेवा सभेचे गुरमीत सिंग अरोरा यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, आदर्श इंग्लिश हायस्कूल व गुरूद्वारा सिंग सेवा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.  

याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तद्नंतर शहीद वीर बालकांवर आधारित प्रेरणादायी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. कार्यक्रमाला आदर्श महाविद्यालय, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. यात स्थानिक शिख व सिंधी समाजाच्या छोट्या बालकांनी तलवार, डोळ्यांवर पट्टी बांधून नारळ फोडणे, चक्र फिरवणे, असे साहसी व शौर्य पुर्ण खेळांचे प्रदर्शन करून प्रेक्षकांना अचंबित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितपाल सिंग टुटेजा, हरीश मोटवानी, प्रिन्स अरोरा, इंद्रपालसिंघ खालसा, आनंदसिंघ चावला, प्रा. अमरजीत चावला, गुरबचन मक्कड, डिंपल चावला, शट्टी सलुजा या गुरूद्वारा पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

  Print

News - Gadchiroli

Related Photos