महत्वाच्या बातम्या

 हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे रेशन बंद करू नका : आ. डॉ. देवराव होळी यांची शासनाला विनंती


- हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे आ. डॉ. देवराव होळी यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : हंगामी फवारणी कर्मचारी हे अस्थायी  स्वरूपाचे असून त्यांना गरजेनुसार शासन मजूर कामगार म्हणून रोजंदारी मानधन तत्वावर काम देत असते. अशा मजूर कामगारांना कर्मचारी समजून त्यांना देण्यात येणारे सरकारी रेशन धान्य बंद करून त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी शासनाकडे केली आहे. 

हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी याबाबतचे निवेदन आ. डॉ. देवराव होळी यांना देऊन याबाबत न्याय मिळवून देण्याची त्यांना विनंती केली आहे.

हंगामी फवारणी कर्मचारी हे स्थायी कर्मचारी नसून त्यांना शासनाचे कोणतेही वेतन, देय, भत्ते पगार दिले जात नाही. त्यांना कामाच्या तत्त्वावर मानधन दिले जाते असे असताना त्यांना शासनाचा कर्मचारी समजून त्यांचे रेशन बंद करणे योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे रेशन बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos