महत्वाच्या बातम्या

 २१ तारखेला पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवनात होणार


- कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूरचे आयोजन

- विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मराठी विषय शिक्षकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन वरोरा येथे २१ जानेवारी २०२४ ला आयोजित केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय अधिवेशनात तीन सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक उपस्थित राहणार आहेत.

पहिला राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक चंद्रपूर, प्रमुख अतिथी उल्हास नरड शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर, श्रीकांत पाटील वरोरा, सुनील डिसले राज्याध्यक्ष, संपतराव गर्जे कार्याध्यक्ष, बाळासाहेब माने सचिव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयी शिक्षक महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रतिभा धानोरकर ह्या आहेत.

दुसऱ्या सत्रात शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अभ्यासक्रमातील विविध घटकांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. माधुरी काळे वर्धा, सदस्य, अभ्यासक्रम मंडळ पुणे, डॉ. शालिनी तेलरांधे नागपूर, डॉ. विजय सोरते बल्लारशा, डॉ. विठ्ठल चौथाले चामोर्शी, डॉ. सुधीर रायपुरकर नागपूर, भगवान शोभणे भंडारा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तिसऱ्या सत्रात प्राचार्य धर्मराज काळे गडचांदूर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. ज्ञानेश हटवार भद्रावती यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. 

यानंतर आनंदवन चा स्वरानंद आर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच आनंदवन भ्रमंती चे आयोजन केले आहे.

या विविध सत्रात चालणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील डीसले राज्याध्यक्ष, बाळासाहेब माने सचिव, संपतराव गर्जे कार्याध्यक्ष, डॉ. ज्ञानेश हटवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, डॉ. सुधीर मोते जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, विजया मने जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, संजय लेनगुरे जिल्हा प्रतिनिधी भंडारा, पवन कटरे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया, यशवंत पवार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ, सुरेश नखाते जिल्हा प्रतिनिधी नागपूर, राजेश डंभारे जिल्हा प्रतिनिधी वर्धा, संजय राठोड जिल्हा प्रतिनिधी अमरावती, रोहीदास चव्हाण जिल्हा प्रतिनिधी वाशिम, गणेश शिंदे जिल्हा ए बुलढाणा, विशाल गावंडे जिल्हा प्रतिनिधी अकोला, डॉ. राजेंद्र सोनवणे जिल्हा प्रतिनिधी जालना तसेच समस्त राज्य कार्यकारिणी तसेच चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाने केले आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos