महत्वाच्या बातम्या

 सीरम इन्स्टीट्यूटने तयार केली कॅन्सर वरील लस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : केंद्रीय औषध प्रयोग शाळेत सफल झाल्यानंतर आता सर्व्हिकल कॅन्सरवर मात करणाऱ्या लशीला ग्रीन सिग्नल देण्यात आला. या लशीला यापूर्वी ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DGCAI) कडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय औषध प्रयोग शाळेत ही लस तपासण्यासाठी पाठवण्यात आली होती. आपल्याच देशात निर्माण करण्यात आलेली आणि सर्व्हिकल कॅन्सरवर (Cervical Cancer) मात करु शकणारी लस अखेरीस तयार झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लशी तयार करणाऱ्या सीरम कंपनीनेच (Serum Institute) ही लस तयार केली आहे. या पहिल्या स्वदेशी ह्युमन पेपिलोमा व्हायरस व्हॅक्सीनचं नाव आहे CERVAVAC. कसौलीमध्ये असेलल्या केंद्रीय औषधांच्या प्रयोग शाळेतही मानकांवर ही लस पात्र ठरलेली आहे. या लॅबचे संचालक सुशील साहू यांनी ही माहिती दिली. केंद्रीय औषध प्रयोग शाळेत सफल झाल्यानंतर आता सर्व्हिकल कॅन्सरवर मात करणाऱ्या लशीला ग्रीन सिग्नल देण्यात आलाय. या लशीला यापूर्वी ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DGCAI) कडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय औषध प्रयोग शाळेत ही लस तपासण्यासाठी पाठवण्यात आली होती. त्या ठिकाणी आठवडा भरात 3 बॅचमध्ये याचं परीक्षण करण्यात आलं.

या 3 बॅचमध्ये 70 हजार औषधे होती. ज्याच्या गुणवत्तेची आणि परिणामांची तपासणी करण्यात आली. बालिका दिनाच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते सर्व्हिकल कॅन्सरवर मात करणाऱ्या या पहिल्या स्वदेशी लशीचं लाँचिंग करण्यात आले होते. ही लस तयार होण्यासाठी सुमारे 6 ते 7 वर्षांचा काळ लागला. ह्युमन पेपिलोमा व्हायरसला तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्निकल इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेएशन यांनी सहकार्य केले आहे.

सर्व्हीकल कॅन्सर हा सर्व्हीक्सचे लायनिंग म्हणजेच गर्भाशयायाच्या मुखाला ग्रासणारा कर्करोग आहे. सर्विक्सच्या लायनिंगमध्ये दोन तऱ्हेच्या कोशिका असतात. त्यांच्यापैकी एका तऱ्हेच्या कोशिका सपाट ( फ्लॅट ) असतात, तर दुसऱ्या स्तंभ कोशिका असतात. गर्भाशायामध्ये एक कोशिका दुसऱ्या कोशिकेमध्ये जिथे परिवर्तित केली जाते, त्या भागाला स्क्वेमो-कॉलमर जंक्शन असे म्हटले जाते. या भागामध्ये सर्व्हीकल कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वात अधिक असते. गर्भाशयाच्या मुखाशी विकसित होणारा कॅन्सर अतिशय सावकाशीने पसरतो. सर्व्हीकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, म्हणजेच एचपीव्हीमुळे उद्भवतो. हा व्हायरस यौन संबंधातून किंवा त्वचेच्या संबंधातून फैलावतो. काही महिलांच्या सर्व्हीक्समध्ये एचपीव्ही व्हायरसचे संक्रमण सतत होत असल्याने हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. याचे निदान नियमित पॅप स्मियर नामक परीक्षणाद्वारे करता येते.





  Print






News - Rajy




Related Photos