सुकमा जिल्ह्यात 'प्रहर चार' अभियानात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहिद


वृत्तसंस्था / रायपूर :   नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, दोन जवान शहीद झाले आहेत. या अभियानाला 'प्रहर चार' असं नाव देण्यात आलं होतं.
प्राप्त माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस हद्दीत ही चकमक उडाली. छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर नक्षलवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सीमा सुरक्षा दल आणि विशेष कृती दलाचं संयुक्त पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं.   किस्टाराम पोलीस हद्दीत हे पथक पोहोचताच नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारास सुरक्षा दलाच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यात नऊ नक्षलवादी मारले गेले. तर, दोन जवान शहीद झाले. घटनास्थळी अतिरिक्त फौज पाठवण्यात आली आहे, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली.   Print


News - World | Posted : 2018-11-26


Related Photos