महत्वाच्या बातम्या

 गुंजेवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील मौजा. गुंजेवाही येथे नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य विभाग, जि.प. चंद्रपूर तथा अवंती ऑप्टिकल, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा.आ. केंद्र, गुंजेवाही इथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. यावेळी २५०-३०० नागरिकांनी नेत्र तपासणी तर २५० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप करण्यात आले.

या सेवाभावी शिबिराचे उदघाटन सरपंच वसंत टेकाम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गुंजेवाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ममता पत्रे, ग्रामपंचायत सदस्य तसेच जन आरोग्य समिती सदस्य पुनेश गांडलेवार, ग्रा.पं. सदस्य सादिक शेख, जन आरोग्य समिती सदस्य रोशन कोरेवार यांच्या हस्ते रिबीन कापून मोफत डोळे तपासणी शिबिराला सुरवात करण्यात आली. 

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी रमनलाल बेदरे, आ.सहा. ललिता कोसमशिले, आ. सहा (स्त्री.) प्रफुल वाकडे, वैशाली राऊत, आ. सेविका, आकाश मोगरे व त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविका मंगला मुत्तेलवार, निलिमा रामटेके, अविषा कुळमेथे यासह गावातील व बाहेर गावातील बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos