राळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मारेगाव :
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने धुमाकूळ घातला असून आज १३ वा बळी घेतला आहे. 
वाघू राऊत (६०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघू राऊत हा गुरखी असून आज ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्याच्यावर वाघाने हल्ला केला. घटनास्थळी पोलिस पथक किंवा वनविभागाचेक अधिकारी दाखल झालेले नाहीत. यामुळे वातावरण संतप्त आहे. वाघाने धुमाकूळ घालत अनेकांना लक्ष्य करणे सुरू केले असल्याने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2018-08-11


Related Photos