पाथरीच्या ठाणेदारांच्या सतर्कतेने वाचले आठ जनावरांचे प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पाथरी :
स्थानिक पोलिस ठाण्याचे ठाणेदार गस्तीवर असताना गडचिरोली येथून पाथरी मार्गे सिंदेवाहीकडे बैलांना एका वाहनात कोंडून नेले जात असल्याची माहिती मिळाली. ठाणेदारांनी माहिती मिळताच तातडीने नाकाबंदी करून वाहन थांबूवन आठ बैलांचे प्राण वाचविले आहे.
ठाणेदार निलेश चवरे हे गस्तीवर असताना माहिती मिळताच नाकाबंदी करून बोलेरो वाहनास अटकाव केला. या वाहनाची तपासणी केली असता  तीन गायी आणि पाच बैल अशी ८ जनावरे कोंडून नेली जात होती. वाहन व जनावरांना ताब्यात घेवून आरोपी अमोल गणपत बोलके (३५) , जिवन नाना बोलके (२६) आणि जावेदखान अताउल्ला खान (३४) तिघेही रा. मनभा ता. कारंजा लाड जि. वाशित यांना अटक केली. आरोपींकडून १ लाख ८१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार निलेश चवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुध्दे, दत्ता बोरडे, सुरेंद्र काकडे, रूपेश सावे, किशोर वाकाटे, सुरज शेडमाके यांनी केली आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-08-08






Related Photos