हाॅटेल मधुन ५० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  / शिर्डी : 
 येथिल नावाजलेले हाॅटेल शांतीकमल येथुन आज ३० डिसेंबर रोजी दुपारी  २ च्या सुमारास सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी गेल्याने मोठी खळबळ उडाली. सदर बॅगमध्ये ५० तोळे सोने असल्याचे सांगितले जात आहे. 
आज  ३० डिसेंबर रोजी मालेगांव येथील पटणी परिवार व नाशिक येथील शाह परिवार यांचा विवाह सोहळा शिर्डी येथिल हाॅटेल शांतीकमल येथे आयोजित केला होता.  या सोहळ्यात वधुसाठी वर पक्षाकडुन आणलेले ५० तोळे  सोन्याचे दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते. आज दुपारी २ वाजेच्या सुमार दोन अज्ञान चोरट्यांनी पाळत ठेवून ५० तोळे सोने असलेली बॅग चोरुन नेली. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी सी.सी.टि.व्ही कॅमेऱ्याची तपास केला असता दोन तरुण संशयास्पद स्टेज जवळ फिरत असल्याचे दिसत आहे. याच दोन मुलांनी बॅगवर पाळत ठेवून विवाह स्टेजजवळील नातेवाईक बोलन्यात गुतंलेले असतांना सोफा यावर ठेवलेली दागिन्याची बॅग एका तरुणाने उचलुन पळुन गेल्याचे अढळुन आलेचे कॅमेरात स्पष्ट दिसत आहे. याबाबत शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोनि अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करत आहे.या  तपासाकामी पोलिस पथक रवाना केले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-30


Related Photos