महत्वाच्या बातम्या

 घरोघरी जावून आरोग्य विभाग देणार गोळ्या


- राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला आजपासून सुरूवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ आज पासून करण्यात आला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वत: हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन करून केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक औषधउपचार मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, आकाश अवतारे, अर्चना यादव, डॉ. भंडारी, जागतीक आरोग्य संघटनेच्या समन्वयक डॉ. भाग्यश्री उपस्थित होत्या. मलेरीया अधिकारी डॉ. अदिती त्याडी यांनी प्रास्तावीक केले व मोहिमेतील विस्तृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

आजपासून 20 फेब्रुवारी पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार असुन, या मोहिमेदरम्यान पात्र लाभार्थ्यांनी वयानुसार व उंचीनुसार हत्तीरोगास प्रतिबंधात्मक गोळया समक्ष खाऊ घालण्यात येणार आहेत. तरी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos