महत्वाच्या बातम्या

 मंगल कार्यालय व लॉनमालक यांना कार्यक्रमातील कचरा जमा करण्यासाठी व्यवस्था करने बंधनकारक


- अन्यथा प्रत्येक तपासणीत १० हजारांचा दंड  

- ऑन कॉल कचरा गाडीसाठी डायल करा ९३५६८५०७६० क्रमांक  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील मंगल कार्यालय व लॉनमालक यांना त्यांच्या परीसरात तयार होणाऱ्या घनकचऱ्यासाठी डस्टबीन ठेवणे बंधनकारक असुन  परिसर ओला व सुका कचरा मुक्त ठेवण्याची जबाबदारी संबंधीतांची आहे. यापुढे विलगीकृत घनकचरा संकलनासाठी आवश्यक डस्टबीन ठेवल्याचे आढळुन न आल्यास मनपा घनकचरा उपविधीनुसार प्रत्येक तपासणी दरम्यान १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

१०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्मिती करणारे अथवा त्या शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांना बल्क वेस्ट जनरेटर म्हटल्या जाते. घन कचरा निवारण नियम २०१६ नुसार बल्क वेस्ट जनरेटरला त्यांच्या स्तरावर कचऱ्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. याकरीता १२० लिटर कचरा जमा करण्याची क्षमता असलेली ओला कचऱ्यासाठी निळी व सुक्या कचऱ्यासाठी हिरवी डस्टबीन मंगल कार्यालय व लॉन मध्ये ठेवणे व त्याचा वापर करणे हे बंधनकारक आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत उपद्रव शोध पथक ( NDS ) तयार करण्यात आले, असुन सदर पथकाद्वारे तपासणी करतांना विलगीकृत घनकचरा संकलनासाठी आवश्यक डस्टबीन ठेवल्याचे आढळुन न आल्यास मनपा घनकचरा उपविधीनुसार प्रत्येक तपासणी दरम्यान १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

काही कॅटरर्सकडे मोठा कचरा नेण्यास गाडी नसते तेंव्हा उपरोक्त ठिकाणांहुन घनकचरा संकलीत करण्यासाठी मनपामार्फत BOT तत्वावर ५०० रु. शुल्क आकारून ऑन कॉल कचरा गाडी उपलब्ध करून देण्यात येत असुन याकरीता मंगल कार्यालये व लॉन यांनी कॅटरर्स यांच्याकडुन ५०० रुपये आगाऊ रक्कम घनकचरा वाहतुकीसाठी शुल्क घ्यावे. ऑन कॉल कचरा गाडीसाठी यांत्रीकी विभागातील ९३५६८५०७६० या क्रमांकावर संपर्क करून गाडी बोलविता येणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos