महत्वाच्या बातम्या

 अपर जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभागामार्फत आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मरुगानंथम एम., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीवर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक छाया येलकेवाड, विधी अधिकारी अनिल तानले आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत 35 पैकी एकूण 34 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यात प्रथम हप्ता 16 प्रकरणे तर द्वितीय हप्तामधील 18 प्रकरणांचा समावेश आहे. तसेच तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करावा, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी देशपांडे यांनी पोलिस विभागाला दिल्या.

आतापर्यंत एकूण नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या 1626 आहे. यात पोलिस तपासावर 31 गुन्हे, पोलिस फायनल 129, न्यायप्रविष्ठ 1429, ॲट्रॉसिटी कलम कमी केलेले 35 आणि पोलिस ॲबेटेड समरीवरील 2 गुन्ह्यांचा समावेश आहे. न्यायप्रविष्ठ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली 94 प्रकरणे, दोषमुक्त झालेले 916, केस मागे घेतलेले 92, विथड्राल ॲबेटेड समरी 11, न्यायालयातून कलम कमी 5 आणि न्यायालयात प्रलंबित 311 असे एकूण 1429 प्रकरणे असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त यांनी दिली.

  Print


News - Chandrapur
Related Photos