महत्वाच्या बातम्या

 पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर दौऱ्यावर आलेल्या अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपल्यानंतर मंत्री सत्तार यांनी निर्मल अर्बन बँकेला सदिच्छा भेट दिली. त्यांनतर त्यांनी हिंगणा नजीकच्या बाबासाहेब केदार शेतकरी सहकारी सूतगिरणीला भेट देत पाहणी केली. यावेळी माजी मंत्री तथा गिरणीचे उपाध्यक्ष रमेशचंद्र बंग यांनी सत्तार यांचा सत्कार केला. त्यांनतर त्यांनी कोंढाली जवळच्या निर्मल टेक्सटाईल पार्कला भेट देत पाहणी केली.

कापसाचा प्रदेश अशी विदर्भाची ओळख आहे. नागपूर जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया करीत विविध उत्पादनांची निर्मिती होत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री सत्तार पाहणी दरम्यान म्हणाले.





  Print






News - Nagpur




Related Photos