महत्वाच्या बातम्या

 जिल्हा कारागृहात बंदीजनांची दंत व डोळे तपासणी शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे बंद्यांसाठी लॉयन्स क्लब कडून जनरल तपासणी, दंतरोग व नेत्ररोग तपासणी व समता फाउंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने त्वचारोग तपासणीचे 1 मार्च 2023 रोजी पुरूष व महिला बंद्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये कारागृहातील एकूण 124 बंद्यांनी व 10 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. लॉयन्स क्लब यांच्या मार्फत जनरल सर्जन डॉ. प्रदिप मेघरे, दंतरोग तज्ञ डॉ. मनिष बत्रा व नेत्ररोग तज्ञ डॉ. योगेश जिभकाटे या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून बंद्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले.

समता फाउंडेशन कडून त्वचारोग तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये 110 पुरूष बंदी व 5 महिला बंदी यांनी सहभाग नोंदविला. त्वचारोग तज्ञ डॉ. स्नेहा आकरे यांनी बंद्यांची तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले. या शिबीरास कारागृह अधीक्षक अमृत आगाशे, तुरूगांधिकारी श्रेणी-2 संतोष क्षिरसागर तसेच इतर कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos