महत्वाच्या बातम्या

 नझुलपट्यांचे नुतनीकरण महिन्याभरात करा अन्यथा पट्टे नझुलजमा करणार : जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :  जिल्ह्यात एकूण दहा हजार ८०७ नझुल पट्टे आहे. यापैकी सुमारे नऊ हजार नझूल पट्ट्यांचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. या पट्ट्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उपलब्ध असून एका महिन्याच्या आत नुतनीकरण न केल्यास जागा नझुल जमा करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी संबंधिताना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन व नझूल पट्ट्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी दिपमाला चौरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. नझुल पट्ट्यांचे नुतनीकरण करण्यासाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यात प्रथम भाडेपट्टा, लगतपूर्व कालावधीचा नुतनीकरण भाडेपट्टा, आखीव पत्रिका, मालमत्ता पत्रक तीन महिन्याच्या आतील नगर भूमापन कार्यालय यांचा मूळ शिक्का असलेली, नझूल खसरा मूळ - नगर भूमापन कार्यालय यांचा मुळ शिक्का असलेला, नझूल खसरा मूळ - नगर भूमापन कार्यालय यांचा मुळ शिक्का असलेली, चौकशी पंजी मुळ - नगर भूमापन कार्यालय यांचा मुळ शिक्का असलेली, नझूल भुभाडे भरल्याची पावती चलानाची प्रत, १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शासनाच्या अटी मान्य असल्याबाबत शपथपत्र, विक्री पत्र खरेदी विक्री झाले असल्यास, हस्तांतरणाबाबत या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकामाचे या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, मंजूर बांधकाम नकाशा प्रत, वाणिज्यक वापर असेल तर या कार्यालयाकडुन वापराबाबत घेण्यात आलेली परवानगी, डीड आफ डिक्लरेशन डी.ओ.डी. सदनिका असल्यास , सहधारकांचे संमतीपत्र, ओळखपत्र आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड अशी सर्व कागदपत्रे साक्षांकित असणे आवश्यक असणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos