महत्वाच्या बातम्या

 कच्चेपार : वाघाच्या हल्यात बैल ठार व गुराखी गंभीर जखमी


- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथे पट्टेदार वाघाचा धुमाकुळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथे एका दिवसात दोन  घटना घडल्या आहेत. काल गावपरीसरात गुराखी बाबुराव देवताळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. पट्टेदार वाघाने स्थानिक रहिवाशी नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घराच्या गोठ्यात शिरून बैलावर हल्ला चढवत जागीच ठार केल्याची घटना काल रात्री १२:२० च्या दरम्यान घडली. 

कच्चेपार हे गाव चहुबाजूने जंगलव्याप्त असल्याने कालच गट क्रमांक १४७ मध्ये गुरेढोरे चारून घरी परतताना गुराखी बाबुराव लक्ष्मण देवताळे (५६) यांना ५:०० वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर पुढे उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटेत राजोलीजवळ त्यांचा शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे नजीकच्या मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ही घटना ताजी असतानाच वाघाने गोठ्यात शिरूर बैलाला ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनकर्मचारी यांनी ताबड़तोब या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील लोकांनी केली आहे.

  Print


News - Chandrapur
Related Photos