महत्वाच्या बातम्या

 क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले जयंती निमित्त सुंदर, गुणवत्ता पूर्ण व सोयींनी युक्त सज्ज शाळा स्पर्धा घेण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी 14 प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील 3 विद्यार्थी कु. ईशानी मनोज शिंदे, कु. स्वरा शिंदे, कु. शारदा रामगोपाल पांडे यांची निवड करण्यात आली. त्यांना सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य व वन मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेमधील एका विद्यार्थीची निवड करून त्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. शहरातील उत्कृष्ठ व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून प्रथम पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, द्वितीय पुरस्कार विजयालक्ष्मी प्राथमिक शाळा, तृतीय साईबाबा प्राथमिक शाळा, चतुर्थ पुरस्कार गांधी विद्यालय टेकडी विभाग यांना देण्यात आला. 

तर उत्कृष्ट शिक्षक म्हणून राकेश पायताडे, श्रीनिवास नरसय्या, राजेंद्र गुडघे, घनश्याम पारधी यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच परीक्षक श्रीनिवास उनवा, अरविंद येमुलवार आणि संतोष अतकरे यांचा ही सत्कार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. पुरस्कार कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सचिव शशिकांत मुंडे, सुधाकर सिक्का, कमल वर्मा, विनोद कोवे, आकाश चौधरी, प्रेमदास कोकंटी, पवन कलवला, रुपेश व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos