महत्वाच्या बातम्या

 आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी नियोजन करा : आमदार डॉक्टर देवराव होळी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ वर्षानंतरही गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव अजूनही विकासापासून दूर आहेत. या आदिवासी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन शॉर्ट टर्म व लॉन्ग टर्म योजना राबवण्यासाठी प्रयत्न करत आहे का. असा प्रश्न आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी विधानसभेत आदिवासी विकास मंत्री यांना विचारला व आदिवासी समाजाच्या उन्नती सर्वांगीण विकासासाठी योजनांची नियोजन करावे अशी विनंती केली. तसेच घरकुल न मिळालेल्या आदिवासी समाजासाठी शबरी घरकुल योजना व आदिम जमातीच्या योजनेचा कोठा वाढवणार का. याबाबतही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना विधानसभेत विचारणा केली. यावेळी मंत्री महोदयांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लॉन्ग टर्म योजनांच्या नियोजनासाठी शासनाने समिती निर्माण केलेली असून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या लॉन्ग टर्म योजनांवर लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.





Facebook    Twitter      
  Print






News - Nagpur | Posted : 2022-12-30




Related Photos