पर्यावरण खात्याचे कडक पाऊल : प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
राज्यात काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणली होती. तसेच जुना स्टॉक संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही दिली होती. मात्र, दुकानदारांनी मुदत संपूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर सुरुच ठेवल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले असून दुकानात प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. 
सुरुवातीला प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास ५ हजारांचा दंड केला जात होता. याविरोधात दुकानदारांना तक्रारीही केल्या होत्या. आता हा दंड घेण्यात येणार नसून थेट दुकानावरच कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांना पुरेशी संधी दिली होती. आता एकजरी प्लॅस्टिकची पिशवी आढळल्यास थेट दुकानच कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. यासाठी दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-09


Related Photos